Akola police: अकोला पोलिसांची 'नो मास्क नो सवारी' मोहीम सुरू...मुख्यमंत्री यांनी केलं कौतूक Akola Police's 'No Mask No Ride' campaign started ... Chief Minister appreciated

अकोला पोलिसांची 'नो मास्क नो सवारी' मोहीम सुरू...मुख्यमंत्री यांनी केलं कौतूक

Akola Police's 'No Mask No Ride' campaign started ... Chief Minister appreciated


शहरातील प्रत्येक ऑटोरिक्षा वर लावणार पोस्टर्स, सूचना न मानणाऱ्या ऑटो वर होणार दंडात्मक कारवाई



अकोला:  शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर पाहता प्रशासना सोबतच सर्व स्तरातील नागरिकांनी समोर येण्याची आवश्यकता आहे. , अकोला पोलिसांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहरात सर्व सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो डील ह्या सारखे उपक्रम सुरू केले. या उपक्रमाचे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतूक करून,ही संकल्पना राज्यभर राबविण्यात येणार,असे म्हंटले.



संबधीत संघटनेच्या सहकार्याने सर्व सामान्य नागरिकांना कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्रशासनाचे हातात हात देऊन पुढे येण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे, त्याचाच एक भाग म्हणून अकोला शहरात धावणारे जवळ पास दोन हजार ऑटोरिक्षा वर नो मास्क नो सवारी चे पोस्टर्स लावण्याची मोहीम सुरू केली आहे. 



त्यासाठी पाहिले दोन दिवस ऑटो चालकांची शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या अंतर्गत सर्व ऑटो चालकांनी स्वतः मास्क घालावे व ऑटो मध्ये प्रवास करणाऱ्या सवारी ला सुद्धा मास्क घालणे बंधनकारक करावे , सवारी मास्क घालण्यासाठी तयार नसल्यास अशी सवारी ऑटो मध्ये बसवून घेऊ नये, ह्या माध्यमातून स्वतः ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.



या आवाहनाला ऑटो चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरात दररोज जवळपास दोन हजार ऑटोरिक्षा धावत असल्याने ह्या मधून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. ह्या मोहिमेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना प्रबोधन करणे शक्य असल्याने ही मोहीम शहर वाहतूक शाखे कडून शहरात राबविण्यात येणार असून दिलेल्या सुचनेचे पालन न करणाऱ्या ऑटो चालकांनी दंडात्मक कारवाईस तयार राहावे, असा इशारा सुद्धा वाहतूक शाखेने दिला आहे.



ऑटो चालकांना सूचना दिल्या नंतर आज शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम व शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे उपस्थिती मध्ये ऑटो वर" नो मास्क नो सवारी" असा उल्लेख असलेले पोस्टर्स लावणे सुरू केले. या पोस्टर्स साठी खंडेलवाल ज्वेलर्स व विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल ह्यांचे सहकार्य लाभले. येत्या दोन दिवसात शहरातील जवळपास बाराशे ऑटो वर असे पोस्टर्स शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी लावणार असून सूचना न पाळणाऱ्या ऑटो वर कारवाई आरंभ होणार आहे.

टिप्पण्या