- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दिव्यांग मुलीवर पाशवी अत्याचार; आरोपीला अटक
हिवरखेड:येथील गृहरक्षक दलाचा जवान संतोष सिताराम इंगळे याने एका गतीमंद व दिव्यांग मुलीवर पाशवी अत्याचार करून माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची घटना हिवरखेड येथे सोमवारी घडली.
सविस्तर वृत्त असे की, हिवरखेड येथील भीम नगर परिसरात एक गतीमंद व दिव्यांग मुलगी आपल्या आई वडिल आणि भावा समवेत राहते आणि तिचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवितात. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान मतिमंद मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी संतोष इंगळे याने मुलीवर पाशवी अत्याचार करून घटनास्थळावरून पळ काढला. मुलीचे पालक घरी आल्यावर शेजाऱ्यांमार्फत त्यांना या घटनेची माहिती मिळाली. पीडित मुलीला विचारणा केल्यावर तिने सर्व हकीकत पालकांना सांगितली.
हिवरखेड पोलीस स्टेशनचा कारभार तेल्हारा पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आल्यामुळे पीडित मुलीसह तिच्या आईने तेल्हारा पोलिस ठाणे गाठून आरोपी संतोष सिताराम इंगळे याच्या विरोधात फिर्याद दिली. तेल्हारा पोलिसांनी मुलीला वैद्यकीय चाचणी करिता पाठवून तात्काळ आरोपीला अटक केली. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३७६ (२), ५०६ नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा