Narendra Modi birthday:अकोला भाजपा तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस साजरा celebrates Narendra Modi's birthday by implementing various social activities

अकोला भाजपा तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस साजरा;मात्र,covid-19 नियमांचा फज्जा

Akola BJP celebrates Narendra Modi's birthday by implementing various social activities; However, the covid-19 rules fuzz



भाजपा पश्चिम दक्षिण मंडल तर्फे प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण व स्वच्छता अभियान 

अकोला: महानगर सेवा सप्ताहचे आयोजन  केंद्रीय शिक्षण मंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात आमदार गोवर्धन शर्मा,  आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने यांचा मार्गदर्शनाखाली मंडल अध्यक्ष अमोल  गोगे यांचा अध्यक्षतेखाली श्याम बाबा मंदिर जवळ हिंदू स्मशानभूमी गीता नगर व शिवसेना वसाहत मध्ये वृक्षारोपण व स्वच्छता अभियानचा कार्यक्रम पार पडला. 



यावेळी पश्चिम झोन सभापती जयश्री दुबे, दिलीप मिश्रा, हेमंत शर्मा, उमेश गुजर, मंगेश सावरकर, अमोल मोहकार, अभिषेक भगत, अमोल गीते, प्रमोद टेकाडे, सुनील बाटे, अमर तळोकार, गजानन वाडेकर, कुणाल डोर्इफोडे, चंदू महाजन, पुष्पा वसतकर, बेबी गीते, उमा शर्मा ,डॉक्टर संजय ढोरे आदी पश्चिम दक्षिण मंडलाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.



भाजपा व युवा मोर्चा  हिवरखेड ग्रामीण कडुन वृक्षारोपण

हिवरखेड येथे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वात भाजपा व सर्व आघाड्याचे वतीने सर्व बुथ प्रमुख सेवा सप्ताह कार्यक्रम अतर्गत बस स्टॅड, ओम शक्ती धाबा , सदाशिव सस्थांन , कला व वाणिज्य महाविध्यालय, शंकर सस्थान येथे  वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. 



यावेळी जिल्हा भाजपा कार्यकारीणी सदस्य रमेश दुतोंडे, अनिल कराळे, महेद्र भोपळे, बाळासाहेब नेरकर, किरण सेदानी, रामदास  गांवडे, कृष्णा तिडके , अंकुश हिवराळे, सुधाकर डालके, केशव कोरडे, बजंरग तिडके, तसेच जिल्हा परिषद सदस्या  सूलभा दुतोंडे, पचांयत समीती सदस्या  गोकुळा  भोपळे, तालूका भाजपा महीला आघाडी उपाध्यक्षा प्रतिभा येऊल , दीपाली  तिडके,  विजया कराळे, उज्वला  नेरकर,  उज्वला  येऊल, मंगेश मोरोकार, अकेश पंचबुधे, प्रशांत कूलकर्णी, गजानन भटकर, कामगार आघाडीचे गजानन राठोड, राहुल इगोंले, मोनु शर्मा,सूहास चवरे, पुरुषोत्तम पाटील, गजानन कराळे आदी हजर होते.  


बाळापूर ग्रामीण तर्फे उरुळ येथे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले.


सबका साथ सबका विकास सबका विश्वास

अकोला: शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी  व  शेती उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितार्थ तीन   विधेयकांना काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी विरोध करत असून, शेतकऱ्यांच्या विरोधात हे तिन्ही पक्ष असले, तरी भाजपा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.



सबका साथ सबका विकास सबका विश्वास संपादन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध असल्याचे सांगून, नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान  गाव पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत कार्यकर्त्यांनी यशस्वी रित्या covid-19 च्या काळामध्ये करून सामाजिक दायित्व सोबत सेवा हेच धर्म असल्याचे सिद्ध केले आहे, असे आमदार सावरकर यांनी प्रतिपादन केले.



जिल्ह्यात भाजयुमो भाजपा कार्यकर्त्यांनी रक्तदान करून covid-19 मध्ये तिसऱ्यांदा आपला सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच ठिकठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनाची जबाबदारी वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते संघटनेच्या माध्यमातून करून पर्यावरण समतोल राखण्याचे काम केले आहे.  स्वच्छता अभियान जिल्ह्यामध्ये ९०८ ठिकाणी करण्यात आले. 


बाळासाहेब आपोतीकर, शिवाजीराव देशमुख, डॉक्टर शंकराव वाकोडे, सिद्धार्थ शर्मा, सुभाष ठाकूर, अभय जैन, चंदा शर्मा शारदा ढोरे, नीलिमा बोरा, सुनिता गरवाल नीलेश डिओरे, रमेश आलकरी,  संजय जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर, गणेश अंधारे, प्रकाश श्रीमाळी, विलास पोटे, डॉक्टर संजय शर्मा ,गजानन उंबरकार, नयना मनतकर, जयश्री पुणेकर, सचिन देशमुख, प्रवीण डिक्कर, उमेश पवार, धनंजय धबाले, अमरसिंह भोसले, मनीराम टाले, अंबादास माळी, भूषण कोकाटे, कनक कोटक, माधव मानकर, रमेश खोपरे, केशव ताथोड, अमोल साबळे, मनोहर राहणे, योगेश थोरे ,महेंद्र पेजावर, शिवाय ठाकूर, किरण अवताडे, डॉक्टर अमित कावरे, साधना ठाकरे, साधना येवले ,योगिता पावसाळे ,अर्चना चौधरी ,राजेंद्र गिरी,  हरीश आनंदानी,  मनीष  बुंदिले, संजय बडवणे, माधुरी बडवणे, रंजीत खेडकर, बाळ टाले, राजेश नागमोते, राजेश रावळकर आदी उपस्थित होते.


उरळ येथे रक्तदान शिबीर

नया अंदुरा बाळापुर तालुका भाजपाच्या वतीने उरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मा केंद्रीयमंत्री ना संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष आ रणधीर सावरकर माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात माजी जिल्हापरिषद सदस्य शंकरराव वाकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात भाजपा च्या विविध गावातील ४५ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले


या रक्तदान शिबिराचे आयोजन तालुका अध्यक्ष अमोल साबळे यांच्या मार्गदर्शनात बाळापुर तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी केले होते.


यावेळी माधव मानकर, श्रीकृष्ण मोरखडे, आनंद पुंडे, मनचितराव पोहरे,रामदास लांडे, रामेश्वर बोर्डे, रतन गिरी, योगेश पटोकार,संजय अघळते, शाम पोहरे,विजय फुकट, राजेश्वर वैराळे, मनिष वैराळे, शांताराम माळी, विलास पोटे, गोकुळ मुंढे, राधाकृष्ण दांदळे,भरत राऊत, नंदकिशोर तायडे, किशोर कुचके, विलास इंगळे, मंगेश भरणे, विक्की वडतकार, शाम ठाकरे, दिलीप पटोकार,चेतन भरणे,रवींद्र दांडगे, सचिन खोट्टे, शिवा ठाकरे, देवेंद्र घेंगे, जय अवचार, सागर माठे, वाल्मीकी वावरे, सचिन खरात, अक्षय भाकरे,पिंटु बोरकर, गजानन गावंडे, यश सेकसरिया, आशीष भरणे, सागर ठाकरे,भरत राऊत, आकाश वाकडे, अकुश ठाकरे, आशिष भरणे, राजेश दांदळे, विनोद लहाने,अक्षय खंडेराव, गणेश ठाकरे, सचिन खरात,सागर टिकार, दत्ता राऊत, पंकज मेंगे, सुरेश मेहरे, प्रशांत मेहरे आदिसह बहुसंख्य कार्यकर्ते या शिबिरात उपस्थित होते.



अकोट येथे वृक्षारोपण व फळ वाटप 

अकोट:देशाचे पोलादी तथा कणखर नेतृत्व,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी अकोट तालुक्यात साजरा करण्यात आला. भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोहट्टा बाजार येथे वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान राबविण्यात आहे. तसेच  आलेवाडी गेट जवळ राहणारे समाजापासून दुर्लक्षित असलेले पारधी बांधव व त्यांच्या कुटूंबियांना फळ व बिस्किटे वाटप करून नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.



यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अशोक गावंडे, जिल्हा चिटणीस मधुकर पाटकर, जिल्हा बूथ प्रमुख राजु नागमते, तालुका उपाध्यक्ष दत्तू  गावंडे, प स सदस्य संतोष शिवरकार सरचिटणीस किशोर सरोदे, सतीश सावरकर,महिला आघाडी अध्यक्ष  सिंधू गडम, वंदना गावंडे, प्रकाश पाटील गडम ,गजानन नळे, माजी सरचिटणीस सुनील गिरी, केळीवेळी ग्राम मंडळ अध्यक्ष किशोर बुले, सुभाष मुकुंदे, युवा मोर्चाचे रोशन वानखडे, लक्ष्मण वानखडे, सुनील भोंगळ,अनिल इंगळे, मनोज  खंडार गजानन यादव, श्रीहरि मोरे, अनिल अग्रवाल, संतोष फसाले, दिलीप बेंडे, नितीन घुसरकर ,अनिल सनगाळे, बना पवार, आकाबाई पवार आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Covid-19 नियमाचा फज्जा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त अकोला भाजपने विविध सामाजिक उपक्रम सेवा सप्ताह अंतर्गत राबविले.मात्र, एक दोन कार्यक्रम सोडल्यास बहुतांशी कार्यक्रमात कोरोना काळात शारीरिक अंतर ठेवण्याचे भान कार्यकर्त्यांना राहिले नाही.अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून कोविड-१९ नियमांचा पुरता फज्जा उडविला असल्याचे,चित्र समोर आले.



कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश जरी चांगला असला तरी,कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,शिस्तीचे व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया अकोलेकरांनी व्यक्त केल्या.



टिप्पण्या