VBA:एमआयएम, भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश

एमआयएम, भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा  वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश



तेल्हारा, दि. २७: तेल्हारा तालुक्यातील एमआयएम, भाजप युवा मोर्चाचे  अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वात सर्कीट हाऊस तेल्हारा येथे प्रवेश घेतला.



यावेळी बरकत भाई पठाण (AIMIM तालुका अध्यक्ष), इशतियाक अली  
(AIMIM शहर अध्यक्ष), शेख इरफान 
(AIMIM तालुका महासचिव), अश्फाक अली, (AIMIM शहर महासचिव हिवरखेड), शेख मोईन शेख वसिम यांनी प्रवेश केला.



भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सरचिटणीस श्रीकांत रामेश्वर काळे यांनी देखील प्रवेश केला. यासोबतच आकाश जसनपुरे, प्रशांत गावत्रे आणि विनोद सु नृपनारायण, गोपाळ नृपनारायण (जस्त गाव),गजानन गवई, प्रभाकर सावळे (उकळी बाजार) यांनी सुध्दा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेतला.

यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, सचिन शिराळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, संतोष वनवे,
सुभाष रौंदळे यांनी त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक दारोकार यांनी केले तर आभार जीवन बोडदे यांनी मानले.




यावेळी धिरज वरठे, विकास पवार,सुदर्शन बोदडे, रोषन दारोकार, प्रल्हाद पाचपोर, भाऊराव थोरात, प्रकाश वाकोडे, अजय अरखराव, मोईमोद्दिन जमादार, मनिष रहाटे, प्रशांत वरठे, प्रमोद चव्हाण, मनिष गव्हांदे, पंजाब तायडे, श्रीकृष्ण वैतकर, परमेश्वर नागे, सागर खराटे, सिध्दार्थ गवारगुरु, योगेश दारोकार, सुनील बोदडे, अमोल वरठे, संदिप कांबळे, राजेश खडसान, लखन सोनटक्के, प्रताप गव्हांदे, सागर खराटे, अंकित दारोकार, दीपक दारोकार प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या