Road accident:दैनिक भास्करचे अतुल व्यवहारे यांच्यासह अपघातात ३ ठार,१ जखमी;कार व कंटेनरची धडक

दैनिक भास्करचे अतुल व्यवहारे यांच्यासह अपघातात ३ ठार, १ गंभीर ; कार व कंटेनरची धडक


अकोलाखामगाव ग्रामीण  पोलीस स्टेशन हद्दीत आज २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर  अकोल्याकडे जाणारी मारुती अल्टो कार क्र MH 27 AR 3632 व विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर क्र RJ 18 GB 2559 यांच्यात समोरासमोर धडक होवून अपघात घडला. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले.तर 1गंभीर जखमी आहे.


पिंप्राळा  फाट्याजवळ झालेल्या या अपघातात अकोल्यातील शिव नगर परिसरातील चौघे जागीच ठार झाले. यामध्ये अल्टो कारचा चालक  राहुल सातळे (40) यांच्यासह विनोद शंकरराव बावणे( 50),पप्पू मनोहर जोशी ( 45), अतुल वसंतराव व्यवहारे ( 51) जागेवरच मरण पावले. तर अनिल मावळे नामक व्यक्ती गंभीर जखमी आहेत. उपचारासाठी त्यांना खामगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली. 


अपघातस्थळी पोलीस तात्काळ पोहचले. स्थानिक पो स्टे खामगाव ग्रामीण यांचे मदतीने मृतकाना उत्तरीय तपासणी करीता खाजगी वाहनाने शासकीय रुग्णालय खामगाव येथे रवाना करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याचे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव  हजर होते. पुढील कार्यवाही स्थानिक पोलीस करीत आहेत.



दैनिक भास्करचे अतुल व्यवहारे अपघातात ठार

दैनिक भास्करचे अकोला येथील कुशल ऑपरेटर, वृत्त संकलक , उपसंपादक, सुस्वभावी अतुल व्यवहारे यांचे या दुर्घटनेमध्ये निधन झाले आहे. अत्यंत प्रामाणिक अतुल व्यवहारे यांचे असे अपघातात निघून जाणे त्यांच्या कुटुंबासाठी व असंख्य मित्रांसाठी अत्यंत दुःखदायक आहे. 


टिप्पण्या