- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Lockdown2020:संपूर्ण lockdown झुगारून दुकानदारांनी उघडली दुकाने; वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संपूर्ण lockdown झुगारून दुकानदारांनी उघडली दुकाने; वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
अकोला: अकोल्यात रविवारी आज पूर्ण लॉकडाउन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता. हा लॉकडाउन अमान्य करीत आज रविवार,२ऑगष्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जयहिंद चौक, जुनेशहर (अकोला) पोलिसांनी बंद केलेली दुकाने पुन्हा सुरू केली.
रक्षाबंधन सण असताना पोलीस व जिल्हा प्रशासनाने याच सणाच्या पूर्वसंध्येला रविवारी लॉकडाउन जाहीर केला.व्यापारी, छोटे व्यावसायिक यांच्यावर महापालिका व पोलीस व्यवसायिकांना कायद्याचा धाक दाखवून दुकाने बंद करायला भाग पाडत असल्याचे तसेच दंड लावत असल्याचे वंचितच्या पदाधिकारी यांना समजले. यानंतर प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ते डॉ धैर्यवर्धन पुंडकर, गौतम गवई, कलिम खान, राजेश तायडे, सचिन शिराळे, उमेश गोपनारायण,अतुल तेलमोरे, समीर भोजने, मुन्ना तायडे ह्यांनी जुने शहरात धाव घेतली.बंद केलेली दुकाने सुरु करण्यात आली.
काही दुकानदारांनी देखील वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देवून राखी विक्रीची व अन्य दुकाने पूर्ववत सुरू केली. जनता lockdown ला आता पुरती कंटाळली आहेत.त्यातच चार महिन्या पासून व्यवसाय बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण lockdown न करता यामध्ये काही वेळासाठी दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी व्यवसायिकांनी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा