Akola Crime:लहान भावाला यमसदनी पाठविणाऱ्या मोठ्या भावाला तीन दिवसाची पोलीस कोठडी

लहान भावाला यमसदनी पाठविणाऱ्या मोठ्या भावाला तीन दिवसाची पोलीस कोठडी



The elder brother, who sent his younger brother to Yamasadani, was remanded in police custody for three days


अकोला. घरगुती वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची घटला जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील शांतता नगरमध्ये बुधवारी रात्री घडली. आपल्या धाकट्या भावाची लोखंडी पाइपने मारून निर्घृण हत्या करणाऱ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी आरोपीला   जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस २९ ऑगस्ट पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



अरूण मुरलीधर मोरे असे आरोपीचे नाव असून, मृतकाचे नाव जयकुमार आहे. प्राप्त माहितीनुसार, जय हा दारू पिऊन नेहमीच आई आणि भावाला पैसे मागून त्रास देत होता. त्याच्या त्रासाला संपूर्ण कुटुंब कंटाळले होते. बुधवारी रात्री जय आणि अरुणमध्ये  क्षुल्लक वाद झाला होता. त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत होते. या वादात संतप्त अरुणने घरातील लोखंडी पाइप जयच्या डोक्यात मारला. त्यामुळे जय जागीच कोसळला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जुने शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात रात्री पाठविला. 


पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडी रॉड जप्त केला आहे. तपास पथक घटनास्थळावर पोहोचली होती. यावेळी ठसेतज्ञांनी घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे गोळा केले. जुने शहर पोलिस ठाण्यातील डीबी पथकाचे महेंद्र बहादुरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरा याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती आरोपी अरुण मोरे याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात वापरण्यात आलेला पाईप जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश पवार करीत आहेत.


टिप्पण्या