- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शिवनगर जुने शहरातल्या युवकाची दिल्लीत दखल
यश देशमुख याची भारतीय युवा परिषद जिल्हाध्यक्षपदी निवड
अकोला: जिल्ह्यातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यलयाचा विद्यार्थी व शिवनगर जुनेशहर अकोला येथील यश मुकेशराव देशमुख याची देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबविणारी नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या हा युवक सामाजिक क्षेत्रात तीन वर्षापासून सेवा देत आहे. महाविद्यलयाचे प्रतिनिधित्व करताना अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवित विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमी प्रयत्न करीत आक्रमक लढा हा युवक देत असतो.
सामाजिक क्षेत्रात अनेक पदावर कार्य करत असतांना व विविध माध्यमातून नेतृत्व करत असताना नागरिकांच्या मनावर देखील अधिराज्य करणारा हा सामान्य कुटुंबातील युवक कोरोना या रोगाच्या परिस्थितीत तीन महिन्यापासून स्वखर्चाने , स्वयंस्फूर्तीने , स्वकष्टाने शिवनगर, भारतीप्लॉट व जुने शहर परिसरात स्वत:चा परिसर म्हणजे स्वत:चे कुटुंब समजून सामाजिक उपक्रम राबवित आहे.
या कार्याची दखल भारतातील एक मोठी युवा संघटना भारतीय राष्ट्रीय युवा परिषदने दखल घेवून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष त्रिवणीकुमार कोरे व राज्य सचिव कमलेश सोनवणे यांनी त्याची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सामाजिक कार्य सुरु ठेवत माझ्या जिल्ह्याचे नाव नेहमी मोठे करण्यासाठी माझे प्रयत्न असतील, असे यश देशमुखने सांगितले.
टिप्पण्या
यश देशमुख च्या उज्वल भविष्य करता माझ्या खूप खूप शुभेच्छा अजय जागीरदार वृत्तछायाचित्रकार अकोला⛳🌷
उत्तर द्याहटवामाझ्या भावाला उज्वल भविष्यासाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाअमित काकडे
यश खरंच तुला यश मिळाले, ही यशाची पहिली पायरी तू चढला, अशीच भविष्यात ऐक ऐक पायरी तू चढत जा हीच शुभेच्छा - विश्वास देशमुख, फडके नगर, अकोला
उत्तर द्याहटवाCongrats bro 😎
उत्तर द्याहटवाcongratulations
उत्तर द्याहटवाCongratulations Yash 🎊🎊🎊🎊🎉🎉😊
उत्तर द्याहटवाCongrats bhau 💐💐💐
उत्तर द्याहटवाCongratulations Yash
उत्तर द्याहटवाCongratulations यश bhau
उत्तर द्याहटवाCongratulations यश bhau
उत्तर द्याहटवा