World Carrom:श्रीनिवासची आघाडी कायम;रोशीताची मुसंडी पण रश्मी कुमारी अव्वल

श्रीनिवासची आघाडी कायम;रोशीताची मुसंडी पण रश्मी कुमारी अव्वल
अकोला: पुरुष गटात चमकदार खेळाचे प्रदर्शन करत के श्रीनिवासने  आपली आघाडी कायम ठेवली असली तरी वर्ल्ड ऑनलाइन कॅरम चॅलेंज इंडिया २०२० स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या रोशीता जोसेफने चांगली मुसंडी मारली. भारताची रश्मी  कुमारी अद्यापही तिच्यापेक्षा जास्त आघाडीवर आहे.
आठ बोर्डा  मध्ये एक अल्टिमेट स्लॅम व 2 ब्लॅक स्लॅम घेणारा श्रीनिवास दोन अल्टिमेट घेणारा एकमेव खेळाडू ठरला आहे त्यांनी आपला स्कोर आठ पर्यंत कमी केला. विश्वविजेता प्रशांत मोरे एक व्हाइट व 2 ब्लॅक स्लॅम सह चांगला खेळला परंतु पॉईंट पंचवीस पेक्षा कमी करू शकला नाही. विश्व कप विजेता रियाज अकबर अली याने २३ पर्यंत पॉईंट कमी करण्यात यश मिळवले.
दोन ब्लॅक स्लॅम सह रोशिता ९ पॉइंटवर दुसऱ्या दिवसाच्या खेळात आघाडीवर राहिली. तिचा स्कोर ६० पॉईंटवरून ३५ वर आला तरीही एकूण ७६ पॉईंट सह रश्मी कुमारी ची आघाडी मात्र कायम आहे. आयशा साजिद एकूण ८९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर तर रोशिता ओव्हरऑल तिसरा क्रमांकावर आहे
........

टिप्पण्या