Kisan Technology: किसान तंत्रज्ञान स्वतंत्र सत्याग्रह टप्पा दुसरा Kisan Technology Independent Satyagraha Phase II

किसान तंत्रज्ञान स्वतंत्र सत्याग्रह टप्पा दुसरा 
जनुकीय सुधारित बियाणे वितरण समारोह अडगाव बु येथे 
अकोला: जनुकीय सुधारित बियाणे शेतकऱ्यांना सरळ व्यवहारातुन उपलब्ध     व्हावे. या करिता अकोली जहांगीर दहा जून 2019रोजी मागील वर्षी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित पाटील बाहाळे यांच्या शेतातून सुरू करण्यात आले होते.या आंदोलनात प्रतिबंधित ht Bt कपाशी च्या वाणाची लागवड करण्यात आली होती. बियाणे लागवड  आंदोलनाला सुरुवात झाली होती. याचाच टप्पा दोन संबोधून पुन्हा दहा जून 2020 आज रोजी अडगाव बु येथील शेतकरी लक्ष्मीकांत कौठकर यांच्या शेतात अधिकृत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिबंधित ht Bt बियाणे वाटप करण्यात आले.
या वाटपात 357 शेतकऱ्यांनी सहभाग दर्शविला होता. परंतु कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे 10 जून रात्री 12 वाजता पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिलेल्या वेळात बियाणे वाटप करण्यात आले .शेतकरी आपापल्या वेळेच्या सुविधे प्रमाणे आले होते. या कार्यक्रमातुन 357 शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेळेत बियाणे वाटप करण्यात आले.
या बियाणे वितरण समारोहतील शेतकऱ्यांना संबोधित करताना, शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते किसान  तंत्रज्ञान स्वतंत्र आंदोलनाचे सर सेनापती ललित पाटील बाहाळे यांनी कृषी विभागाचे काम कृषी क्षेत्रात संशोधन करून त्याला प्रसारित करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवणे आहे. परंतु, ते काम सोडून ते शेतकऱ्यां पर्यंत तंत्रज्ञान पोहचू नये या दिशेने काम करीत आहे. शेतकऱ्यांना जनुकीय तंत्रज्ञान शिवाय पर्याय नाही कारण शेतीवर जाणसांख्यिकी भार वाढत आहे.कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन मिळणे आवश्यक आहे असं मत शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख सतीश बाबा देशमुख यांनी आपले विचार वक्त केले .
शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख माहीत व तंत्रज्ञान आघाडी लक्ष्मीकांत कौठकर यांनी मागील वर्षी पासून जनुकीय सुधारित बियाण्यांना परवानगी मिळावी, याकरिता आम्ही आंदोलन करीत आहोत. मागील वर्षी 36 टक्के पेरणी ही शासनाने प्रतिबंध लावलेल्या ht Bt कपाशीच्या वाणाची शेतकऱ्यांनी केली होती. तणांचा निर्मूलनाचा खर्च जास्त असल्याने ht Bt कडे शेतकऱ्यांचा कल जात आहे. एकीकडे कृषी विभाग म्हणतोय उत्पादन खर्च कमी करा दुसरीकडे उत्पादन खर्च कमी करणाऱ्या बियानाला विरोध करते. हे समजण्या पलीकडील धोरण आहे. यावरील बंदी उठविल्यास शेतकऱ्यांना सरळ वेव्हारातून अधिकृत बियाणे उपलब्ध होईल. यावर सरकारने लवकरच आपला निर्णय जाहीर करावा.सर्व कृषी केंद्रामार्फत याचा सरळ व्यवहारातुन शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक लक्ष्मीकांत कौठकर,प्रमुख उपस्थितीत ललित पाटील बाहाळे व सतीश देशमुख यांच्या हस्ते नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिलेल्या वेळेत वितरित करण्यात आले.
.....................................................
किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह टप्पा 2
तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम तळेगाव बाजार येथे संपन्न.ht Bt कपाशीच्या वाणाची जाहीर लागवड.

टिप्पण्या