Corona virus news:अकोल्यात आणखी २६ नवे रुग्ण; एकूण १५३६ कोरोनाग्रस्त,३६६ घेताहेत प्रत्यक्ष उपचार!

अकोल्यात आणखी २६ नवे रुग्ण; एकूण १५३६ कोरोनाग्रस्त,३६६ घेताहेत प्रत्यक्ष उपचार!
अकोला,दि.२९ :आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे  ३५७ अहवाल प्राप्त झालेत्यातील ३३१ अहवाल निगेटीव्ह तर २६ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १५३६ झाली आहे. आज दिवसभरात १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आजअखेर ३६६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

 आजपर्यंत एकूण १०७४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०३८८, फेरतपासणीचे १४४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २१७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १०६९० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ९१५४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १५३६ आहेत,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज २६ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी प्राप्त २२ पॉझिटीव्ह अहवालात १० महिला व  १२ पुरुष आहेत.चार जण गजानन नगर, चार जण कळंबेश्वर येथील, तीन जण गाडगेनगर, दोन जण हरिहर पेठ. दोन जण सिंधी कॅम्प, तर दगडी पुल, अकोट फैल, अयोध्यानगर, डाबकीरोड, आदर्श कॉलनी, कामा प्लॉट व विठ्ठल मंदिर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन पुरुष व दोन स्त्री रुग्णांचा समावेश आहे. ते हरिहरपेठ, दगडीपुल, तारफैल व अकोट येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

१८ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात आठ जण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आले. त्यात दोघे सिंधी कॅम्प, दोघे अकोट फैल येथील तर उर्वरित हरिहरपेठ, गुलजारपुरा, जुने शहर व तारफैल येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.तर दहा जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात तिघे सिंधी कॅम्प, दोघे शंकर नगर, दोघे अकोट फैल, बैदपुरा, लाडिज फैल,  गायत्री नगर येथील रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.

३६६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १५३६ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७७ जण (एक आत्महत्या व ७६ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०९३ आहे. तर सद्यस्थितीत ३६६  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या