- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola:*कोरोना अलर्ट*:सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.
*आज मंगळवार दि. २३ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ११०*
*पॉझिटीव्ह- एक*
*निगेटीव्ह- १०९*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.
दरम्यान दुपारनंतर *जीएमसी* मधून १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १० पुरुष व तीन महिला आहेत. त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील लक्ष्मी नगर व तारफैल येथील प्रत्येकी तीन, दोघे विजय नगर येथील तर उर्वरित सिंधी कॅम्प, मलकापूर, डाबकीरोड, चांदुर, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तर *कोविड केअर सेंटर* येथून काल(दि.२२) व आज (दि.२३) मिळून ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात वाडेगाव येथील १३, अकोट फैल येथील आठ, शिवर येथील पाच, रंगारहट्टी बाळापूर येथील चार, तर गायत्रीनगर, गुलजारपुरा, चावरे प्लॉट, जठारपेठ, रजपूतपुरा येथील प्रत्येकी दोन तर शंकरनगर, फिरदौस कॉलनी , मोहता मिल, गितानगर, हरिहरपेठ, सिंधी कॅम्प, संत कबीर नगर, बापूनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. (कोवीड केअर सेंटर येथून प्राप्त माहितीनुसार)
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४४*
*मयत-६७ (६६+१), डिस्चार्ज- ८२६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३५१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा