*कोरोना अलर्ट* Akola: आज दिवसभरात 65 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट* Akola: आज दिवसभरात 65 पॉझिटिव्ह!
*आज बुधवार दि.२४ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)  प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-३१०*
*पॉझिटीव्ह अहवाल-६५*
*निगेटीव्ह-२४५*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त अहवालात ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. ते खदान, शौकतअली चौक, आदर्श कॉलनी, आळशी प्लॉट, देशमुख फैल, लकडगंज, जुना तारफैल, बोरगाव मंजू, शंकरनगर, बार्शी टाकळी आणि वाशिम येथील रहिवासी आहेत.

दरम्यान आज दुपारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती बाळापूर  येथील ४३ वर्षीय पुरुष असून ते दि.९ रोजी दाखल झाले होते. त्यांचा आज दुपारी उपचार घेतांना मृत्यू झाला.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८ जणांना घरी सोडण्यात आले. तर कोविड केअर सेंटर मधून ४५ जणांना घरी सोडण्यात आले. 

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १३०९*
*मयत-७१ (७०+१), डिस्चार्ज-९०५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३३३* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या