Akola@: आज 32 पॉझिटिव्ह!*कोरोना अलर्ट*

Akola@: आज 32 पॉझिटिव्ह!
*कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि.१६ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१३८*
*पॉझिटीव्ह-३२*
*निगेटीव्ह-१०६*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळच्या अहवालात ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात ११ महिला व २१ पुरुष आहेत. त्यातील सात जण चावरे प्लॉट येथील पाच जण बाळापूर येथील दोन जण गुलजारपुरा, दोन जण सिंधी कॅम्प, दोन जण वाशीम बायपास, दोन जण मोठी उमरी, दोन जण तारफैल येथील तर उर्वरीत  शंकरनगर,  अकोट फैल, खदान, इंदिरानगर वाडेगाव, डाबकी रोड, आदर्श कॉलनी, महाकाली नगर, खेतान नगर,  चांदुर खडकी, खामखेड वाडेगाव रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

 दरम्यान आज दुपारनंतर दोघांचा मृत्यू झाला. त्यात एक बाळापूर येथील ७४ वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण दि. १३ रोजी दाखल झाला होता त्याचा आज मृत्यू झाला.  तर अन्य एक बार्शी टाकळी येथील ६२ वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण दि. २६ मे रोजी दाखल झाला होता त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

तर आज दुपारनंतर १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोघांना कोविड केअर सेंटर येथे तर  उर्वरित १६ जणांना घरी सोडण्यात आले. त्यात नऊ पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे.  ह्या रुग्णांपैकी खदान येथील तिघे,  तारफैल येथील दोघे, खडकी येथील  दोघे तर  सिंधी कॅम्प, मोहता मिल, मोठी उमरी, बाळापूर,  देशमुख फैल, गोरक्षण रोड, दीपक चौक, ध्रुव अपार्टमेंट,जीएमसी होस्टेल, सिटी कोतवाली, अकोट फैल येथील प्रत्येकी एक  याप्रमाणे रहिवासी आहेत

*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०७३*
*मयत-५६(५५+१),डिस्चार्ज-६७६*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३४१* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या