*कोरोना अलर्ट*आज दिवसभरात 90 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*
आज दिवसभरात 90 पॉझिटिव्ह!


*आज रविवार दि.२८ जून २०२० रोजी  सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-३४५*
*पॉझिटीव्ह अहवाल-९०*
*निगेटीव्ह-२५५*

*अतिरिक्त माहिती*
 आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या १२ अहवालात सहा महिला व सहा पुरुष आहेत.  त्यात  सात जण तारफैल येथील तर चार जण लहा उमरी येथील व खदान येथील एक जण रहिवासी आहेत.

दरम्यान आज दुपारनंतर एका जणाचा मृत्यू झाला असून त्यात बार्शीटाकळी येथील ५३ वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण दि.१६ रोजी दाखल  झाला होता त्याचा आज दुपारनंतर मृत्यू झाला.

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून  पाच जणांना घरी सोडण्यात आले. ते रुग्ण सिंधी कॅम्प, खैर मोहम्मद प्लॉट, महाकाली नगर, अकोट फैल व शंकरनगर येथील रहिवासी आहेत.
तर कोविड केअर सेंटर मधून  २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात  सिंधी कॅंप मधील सहा जण, खदान, अशोक नगर व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन जण व देशमुख फैल, शिवनी, शिवाजीनगर, लहुजी नगर, लाडिस फैल,  हरिहर पेठ, शंकर नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक  याप्रमाणे रहिवासी आहेत.

 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५१०*
*मयत-७७ (७६+१), डिस्चार्ज-१०७५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५८* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या