Corona effect:आज सरकारने मयखानों के दर खोल दिए -मदन भरगड

आज सरकारने मयखानों के दर खोल दिए -
मदन भरगड
अकोला,दि ५क़ैद चिड़ियों को रखा बाज़ के पर खोल दिए ।
 मंदिरों मस्जिदो में लगाकर ताले,
आज सरकार ने मयखानों के दर खोल दिए । 
सध्या कोरोना या जागतिक महामारीने नागरिक हैराण आहेत. दीड महिन्यापासून लॉ कडाऊन असल्याने हातावर पोट असना-याची उपासमार होत आहे. स्वतःच्या चिमुकल्यासाठी दूध आणण्यासाठी सुद्धा नागरिक बाहेर निघाले नाही. घरात राहून सरकारला सहकार्य केले. मात्र महसूल गोळा करण्यासाठी दारूची दुकाने सुरु करण्याचा अजब निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.यामुळे कितीतरी कुटुंब उध्वस्त होतील. घराघरात कलह सुरु होईल. लोकडाऊन च्या काळात दारूची दुकाने सुरु करण्याच्या निर्णयाचा माजी महापौर मदन भरगड यांनी जाहीर निषेध केला आहे. लोकडाऊन असेपर्यंत तरी दारूची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. गरिबांच्या घरात धान्य आणायला पैसे नसताना त्यांना दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे असा प्रश्न भरगड यांनी उपस्थित केला आहे.
.....

टिप्पण्या