कंचनपुर येथे आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण

कंचनपुर येथे आरोग्य पथकामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण

 अकोला:तालुका अकोला येथील प्रा.आ केंद्र आगर अंतर्गत कंचनपुर येथे कोहीर १९ संसर्गाचा १ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे त्या ठिकाणी एकूण ८ टिम तयार करण्यात आल्या असुन, एकुण २०६ घरांना भेटी देवुन १०२७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात

आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उगवा येथे सर्वेक्षणाच्या दरम्यान स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले ,अति,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगदीश बनसोडे,साथरोग अधिकारी डॉ. सुनिल मानकर, ठाणेदार विलास पाटील तसेच डॉ.गावंडे, सरपंच श्री शिरसाट, तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ.नाथक, अरविंद शिंदे,ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक, आशा आदि सर्वेक्षणाच्या वेळी उपस्थित होते.जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ८ टिम तयार करण्यात येवून सर्वेक्षणाचे कार्य करण्यात आले आहे. सर्व्हेक्षण अहवालानुसार ४० तिब्र जोखीम सपंर्वाचे तर ४३ कमी जोखमीचे नागरीक आढळुन आलेत, तिब्र जोखमीचे नागरीकांना १०८ संदर्भसेवा देवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे संदर्भात करण्यात आले. तर कमी जोखमीचे ४३ नागरीकांना १४ दिवस गृह विलगीकरण करण्याबाबत सुचित करण्यात आले. यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन गावामध्ये बाहेरगाबाबरून व ईतर राज्यातुन आलेल्या सर्वाची आरोग्य तपासणी करण्याबाबत तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी स्वतःहुन तपासणी करून घ्यावी अशा सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्या, तसेच नागरीकांनी घरी रहावे व स्वच्छतेच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येवुन कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करुन घेण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. यावेळी गावचे सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरीक यांनी संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिले अशी माहिती जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी दिली.




टिप्पण्या