- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बेरार एज्युकेशन सोसायटीकडून मदतीचा हात
अकोला:कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासणारी विदर्भातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्रधानमंत्री केअर फंड तसेच मुख्यमंत्री रिलीफ फंड साठी प्रत्येकी रुपये २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचेकडे शुक्रवारी सुपूर्द केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. मोतीसिंह मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष डॉ. रविंद्र जैन, मानद सचिव पवन माहेश्वरी व सहसचिव इंजि. अभिजित परांजपे, तसेच कार्यकारिणी सदस्य ऍड. प्रमोद अग्रवाल, अभय बिजवे, अमीत सुरेका, करण चिमा आणि संस्थेचे आजीवन सदस्य राजेश अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा