- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शहिद आनंद गवई यांची एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी
अकोला,दि.२४: येथील शहिद आनंद गवई यांची एक महिन्याची पेन्शन त्यांचे आई वडील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊ केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे आज त्यांनी या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. ३७ हजार ५५७ रुपयांचा हा धनादेश आज सकाळी शहिद गवई यांची आई गोकर्णाबाई व वडील शत्रुघ्न गवई यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिला. शहिद आनंद गवई हे सन २०१७ मध्ये शहिद झाले होते. त्यांची आज जयंती होती. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ आई वडीलांनी हा धनादेश सुपूर्द केला.
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा