तीन पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली!

तीन पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली!

अकोला दि ३०: बैदपुरा येथील तीन पॉझिटिव्ह रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर गुरुवारी घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालया कडून प्राप्त झाली.

आज गुरूवार दि.३० एप्रिल २०२० रोजी सायंकाळी पाच वाजता ३० रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. तीसही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सकाळी १०पैकी १० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. तसेच सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवाल मध्ये सुद्धा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने अकोलेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. सलग दोन दिवस एकाच दिवशी पाच रुग्ण आढल्यामुळे शहरात खळबळ माजून, भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अशा वातावरणात आज दिलासादायक अहवाल प्राप्त झाले आहेत.अकोल्यातील कोरोना धोका आद्यप टाळलेला नाही.त्यामुळे नागरिकांना दक्षता घ्यावी लागणार आहे.दरम्यान,कृषी नगर,सिंधी कॅम्प, कलाल चाळ रुग्णांच्या संपर्कातील लोकांची वैद्यकीय चाचणी  व परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

......

टिप्पण्या