मास्क सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री, महाराष्ट्रातील नागरिकांच्या फसवणूकीवर कठोर उपाय करण्यात यावी - राजेंद्र पातोडे

मास्क सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री, महाराष्ट्रातील नागरिकांच्या फसवणूकीवर कठोर उपाय करण्यात यावी - राजेंद्र पातोडे
अकोला:कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि महाराष्ट्रात काही रुग्ण सापडताच आता मेडिकल दुकानातून मास्क पाठोपाठ सॅनिटायझरही गायब झाले असून बनावट हँड सॅनिटायझर व बनावट मास्क बाजारात आले आहेत.बनावट हँड सॅनिटायझर मास्क दुप्पट, तिप्पट किमतीत बाजारात विकले जाताहेत. अन्न औषधी विभागाने डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशन शिवाय मास्क विक्रीला प्रतिबंध घातला असला तरी मेडिकल स्टोर संचालक गैरफायदा घेत असल्याचं दिसून येत आहे.मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा असल्याचे सांगुन चढ्या दराने विक्री सुरु असून महाराष्ट्रातील नागरिकांच्या फसवणूकीवर कठोर उपाय करण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
मेडिकलमध्ये सध्या नागरिकांना हव्या असणारे एन ९५ मास्क आणि सॅनिटायझरही गायब झाले आहेत.अचानक मागणी वाढल्याने तुटवडा  सांगण्यात येत आहे.   छोट्या बॉटल्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याऐवजी मोठ्या आणि ५०० रुपयांहून अधिक किमतीच्या बॉटल्स ग्राहकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होत आहे.तर  मुंबई मध्ये बनावट हँड सॅनिटायझर सापडल्याची घटना देखील घडली आहे.अकोल्यात मुदतबाह्य झालेल्या सॅनिटायझर बॉटल् वर स्टिकर लावून ७० रुपयाचे ९० रुपये करण्यात आल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे.एन ९५ मास्क उपलध नाहीत.त्या ऐवजी बनावट मास्क  मोठ्या प्रमाणात सुरु आहे.वापरले जाणारे मास्क आठ तासात डिस्पोजप करणे गरजेचं आहे.ह्या बाबत नागरिका मध्ये प्रचंड अस्वस्थता असली तरी रोजगार आणि उपजीविकेसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडणारे नागरिक हतबल झालेले दिसतात.
त्यामुळे अन्न व औषधी विभागाने जागे होणे गरजेचे आहे.तक्रारी येण्याची वाट न पाहता आरोग्य यंत्रणे बरोबर समन्वय ठेवून कार्यालया बाहेर पडून कामाला लागावे.सोबतच मेडिकल औषधी साहित्यचे उत्पादक व वितरक ह्यांची तातडीने बैठक बोलवून त्यांना निर्देश देण्यात यावेत सोबतच केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनला देखील बैठकीला बोलवून त्यांना सक्त ताकीद देऊन महाराष्ट्रातील मास्क सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री बाबत कार्यवाई करावी, जनतेच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ आणि त्यांची लूट ह्यावर युद्ध पातळीवर उपाय करण्यात यावे अन्यथा अन्न व औषधी विभागाचे जिल्हा कार्यालयावर वंचित चे पदाधिकारी कार्यकर्ते बेशरमच्या फुलांचे हार अन्न व औषधी विभागाचे कार्यालय प्रमुख ह्यांना घालण्यात यातील असा इशाराही राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.

टिप्पण्या