श्रीमदभागवत हे सकल जगताच्या कल्याणाचे सार - गोपाल महाराज

श्रीमदभागवत हे सकल जगताच्या कल्याणाचे सार - गोपाल महाराज
जवाहर नगर चौकात छत्रपती राजे संभाजी पार्कचे नूतनीकरण लोकार्पण सोहळा 
अकोला: श्रीमद भागवत ही शाश्वत सुखाची गुरुकिल्ली असून ते आपणास कर्म,भक्ती व ज्ञान शिकविते. भागवत हे सकल जगताच्या कल्याणाचे सार असून या भागवताचे नित्य श्रवण करून शाश्‍वत सुखाची  अनुभूती घेण्याचे आवाहन वेदांताचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी केले
संत वासुदेव महाराज यांच्या एकशे तीन जयंती पर्वावर वेदांताचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांच्या श्रीमद् भागवत सप्ताहास मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला.
या प्रारंभ सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील,माजी आ. नारायणराव गव्हाणकर, माजी भाजप महानगराध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे,मनपा नेते हरीश आलिमचंदानी, जयंत सरदेशपांडे,सोनल ठक्कर,सौ.लता गावंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते*
डॉ.रणजीत पाटील यांच्या हस्ते तथा पूज्य वेदांताचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांच्या उपस्थितीत यावेळी रीतसर फीत कापून सौंदर्यीकरण झालेल्या जवाहर नगर चौक परिसरातील छत्रपती राजे संभाजी पार्कचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने या सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.*मान्यवरांचे स्वागत ,नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी केले*.नूतनीकरण झालेला हा पार्क महाराजांच्या आगमनामुळे साक्षात भक्तीधाम बनला .पपुजी मोहोड,आदित्य सराग,अंजाले , कोकाटे यांचें फ़ोटोग्राफ़ी वीडीयोग्राफ़ी साठी यानी विशेष सहकार्य केले, राजेंद्र सोनवणे यांनी उत्कृष्ट परिसरात रांगोळ्या करून वातावरण भक्तिमय केले*.यावेळी शिवलाल बोर्डे,भिमराव सोमनाते,हरिदास मसूरकर,रुपम घाटोळ,जीवन देशमुख,देविदास सावरकर,तुकाराम माळी,नारायण ढवळे,श्रीकृष्ण सपकाळे,ढवळे,स्वप्नील गावंडे,डॉ सौ.कल्याणी पवित्रकार आदींनी हारार्पण केले.संचालन राजेश राख यांनी केले.
आशिष पवित्रकार मित्रपरिवार,सिद्धेश्वर गणपती मंडळ शास्त्रीनगर,तथा भारतीय युवा संघटनच्या विद्यमाने जवाहर नगर चौक परिसरातील छत्रपती राजे संभाजी पार्क येथे दि.26 फेब्रु.पर्यंत नित्य सायं.7 ते रात्री 10पर्यंत चालणाऱ्या या भागवत उत्सवात अनेक देखावे व झाक्यां निर्माण करण्यात येत असून यामध्ये कृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन झाकी,रुक्मिणी विवाह कथा,सुदामा मिलन झाकी साकार करण्यात आहेत.या *श्रीमद्भागवत सप्ताहाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आशिष पवित्रकार मित्रपरिवार,सिद्धेश्वर गणपती मंडळ शास्त्रीनगर,भारतीय युवा संघटनच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

टिप्पण्या