- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
इंग्लिश हायस्कूलचा तुषार कडू राष्ट्रीय स्तरावर
अकोला:स्थानिक गायत्री नगर येथील इंग्लिश हायस्कूल चा वर्ग ८ चा विद्यार्थी तुषार मनीष कडू याची १४ वर्षे वयोगटा खालील शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धे करिता निवड झाली आहे. १६ फेब्रुवारी ला श्रीरामपूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी मध्ये तुषार ने अष्टपैलू कामगिरी करीत राज्य क्रिकेट संघात आपले स्थान निश्चित केले. या यशाबद्दल त्याचा आणि वडील मनीष कडू यांचा शाळेत मुख्याध्यापक प्रदीप सिंह राजपूत आणि शिक्षक यांचे तर्फे सत्कार करण्यात आला. तुषार आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक राजकुमार तडस, कोच प्रवीण मुळे व आईवडील यांना देतो. शाळेचे संस्थाध्यक्ष दादासाहेब बोबडे, शिक्षक जयमाला खेडकर,नरेश पाटील, बहादूर सिंह चौहान, उमा टापरे,सचिन खर्चे,संतोष पुरी,प्रणिता पवार,किरण खोडस्कर, सिध्दार्थ खंडारे व अनंता नागे व विद्यार्थ्यांनी तूषारचे अभिनंदन व कौतुक केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा