प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचे निधन

प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचे निधन

अकोल्यात उपचार दरम्यान मृत्यू

अकोला: प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार नाजूकराव पुंडकर यांच्यावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान गोळीबार केला होता. यामध्ये पुंडकर गंभीर जखमी असता , त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक उपचार नंतर अकोला येथे आयकाँन रुग्णलयात दाखल करण्यात आले.  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे अकोट शहर पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतून शुक्रवारी रात्री १० वाजता येत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे पुंडकर काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच अकोट शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पुंडकर यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळली. याप्रकरणी अकोट शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

रात्री 12.30 च्या दरम्यान तुषार पुंडकर यांना अकोला आयकॉन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र,उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने पुंडकर यांची रात्री 3 च्या दरम्यान प्राण ज्योत मालवली.

प्रहारचे माजी अकोला जिल्हाअध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर  21 फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास अकोट शहर पोलीस स्टेशन परिसरात  गोळीबार करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.

अशी घडली घटना

प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार

पुंडकर हे अकोट शहर पोलीस स्टेशनच्या मागील

बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतून शुक्रवारी

रात्री १० वाजता येत होते. यावेळी दुचाकीवरून

आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. तसेच

त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे

पुंडकर काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात

खाली कोसळले. गोळीबारानंतर दोन्ही

हल्लेखोरांनी घटना स्थळावरून पळ काढला.

माहिती मिळताच अकोट शहर पोलिसांनी

घटना स्थळावर धाव घेऊन पुंडकर यांना अकोट

ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. घटना स्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन

काडतुसे आढळली. याप्रकरणी अकोट शहर

पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अकोटात प्राथमिक उपचार

अकोट ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोल्याला हलविण्यात आले होते.ग्रामीण रुग्णालयात त्यांना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

अकोल्यात आयकॉन रुग्णालयात दाखल केले होते. हॉस्पिटल मध्ये प्रहार कार्यकर्त्यांची मोठया प्रमाणात गर्दी केली होती. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



टिप्पण्या