मनिष भारतीची हत्या;बाबा भारती पोलिसांच्या ताब्यात

मनिष भारतीची हत्या;बाबा भारतीला अटक

बाबा भारती यांनी स्वराक्षणार्थ झाडल्या गोळ्या

घटनास्थळावरच मनिष भारतीचा मृत्यू
बापाच्या हातून मुलाची हत्या

अकोला: सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  असलेल्या ब्रम्हांडनायक आपारमेंट मध्ये सोमवार दुपारी 12 वाजताच्या दरम्यान बापाने मुलावर गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली.
मनीष भारती याचा ब्रह्मांड नायक अपार्टमेंटमध्ये  फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये  सोमवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान त्याचे वडील बाबा भारती यांनी मनीषवर गोळी झाडून त्याची हत्या केल्याची घटना घडली.
मनीष भारती वडिलांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या बेतात असतानाच, स्वसंरक्षणार्थ बाबा भारती यांनी त्याच्यावर गोळी झाडली. अशी माहिती समोर येत आहे.या गोळीबारात मनिष भारतीचा  जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी बाबा भारती यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.मनीष भारती हा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारचे आदेश आहेत. बाबा भारती हे अकोल्यातील बडे प्रस्थ असून, अनेक सामाजिक,राजकीय संस्थेशी ते जुळलेले आहेत.
संपत्तीच्या वादातून वडीलाने मुलावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली. ही घटना जठारपेठ चौकातील केला प्लॉटमधील इंद्रायणी मतिमंद शाळेजवळील ब्रम्हांडणायक अपार्टमेंटमध्ये घडली. मृतक मनीष भारती असून मारेकरी त्याचे वडील बाबा भारती आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळी पोलिस अधिकारी उपस्थित आहे. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा मुलगा राजेश भारती ही काँग्रेसचा मोठा नेता आहे

बाबा भारती व त्यांचा मुलगा मनीष भारती यांच्यामध्ये संपत्तीचा बऱ्याच वेळा वाद होत होता. या वादाने परिसीमा गाठली होती. मनिष भारती हा वडील बाबा भारती याच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने वडिलांसोबत संपत्तीवरून वाद घातला. मुलाच्या हातात असलेले धारदार शस्त्र पाहून बाबा भारती यांनी बचावासाठी जवळ असलेली बंदुक काढली. मुलगा अंगावर येत असल्याची दिसतात त्यांनी त्या बंदूकीतून त्याच्या छातीमध्ये एक गोळी झाडली. मुलगा मनीष हा जागीच ठार झाला. ही माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी सिव्हील लाइन, रामदास पेठ यासोबतच शहर उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलिस दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी बाबा भारती यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेबाबत बाबा भारती यांनी पत्रकारांशी सवांद साधून घटनेची तोंडी माहिती दिली. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत. तर दोन दिवस आधी मनीष भारती याला तीन महिन्यासाठी तडीपार करण्यात आली होते. मनीष भारती हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. वृत्त लीहीस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.

टिप्पण्या