बार कौन्सिलच्या बैठकीत मोहता यांचा सन्मान

बार कौन्सिलच्या बैठकीत मोहता यांचा सन्मान
अकोला: मुंबई येथे रविवार, 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या  महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या बैठकीत कोनसिलचे माजी अध्यक्ष तथा सदस्य अकोल्याचे ऍड. मोतिसिंह मोहता यांना सन्मानित करण्यात आले. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोलाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहता यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिलचे चेअरमन अविनाश भिडे, वाईस चेअरमन अमोल सावंत , बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष  सतीश देशमुख यांच्या हस्ते मोहता यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.बैठकीत सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला.
अकोल्यातील नावाजलेली व प्रतिष्ठित असलेली बेरार जनरल एजुकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहता यांची निवड होणे,अभिमानास्पद बाब असल्याचे यावेळी अविनाश भिडे म्हणाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मोहता याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. सत्काराला उत्तर देताना, अकोल्याच्या शैक्षणिक विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील,अशी ग्वाही मोहता यांनी दिली.

टिप्पण्या