धुळीचे शहर ओळख पुसणार

 अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज  जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. त्यांनी यावेळी प्रशासनातील अनागोंदीबद्दल जिल्हा प्रशासनाला तंबी दिली. परत 25 जानेवारीला जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांनी बोलावली. आजच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बच्चू कडूंच्या प्रश्नांनी अधिकार्यांची चांगलीच भंबेरी उडाली.तर क्रीडा अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिली. त्याच प्रमाणे धुळीच शहर अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला शहराची लवकरच ही ओळख पुसून काढणार असल्याचं त्यांनी म्हंटल. अकोला महापालिकेतील अपंगांच्या योजनापासून त्यांना वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला दोन दिवसात निलंबित करण्याची सूचना ही त्यांनी या वेळी केली.तर आपण राज्यमंत्री असल्यानं ज्यादा अधिकार नसल्याची खंत बच्चू कडूंनी व्यक्त केली. सिमीत अधिकारांवर अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली.


टिप्पण्या