political news: नरेंद्र मोदी यांच्या विषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा अकोला भाजपाने केला तीव्र निषेध



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, त्यांच्या जातीचा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, असा दावा केला होता. या वक्तव्याचा राज्यभरात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातही या वक्तव्याचा आज शुक्रवारी तीव्र निषेध नोंदवण्यात आला.



अकोल्यात भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने देत आंदोलन केले. यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अकोला शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह समोर भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जेव्हा जेव्हा टीका झाली तेव्हा तेव्हा जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद दिले आहे असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


भारतरत्न महामानव घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहजवळ लोकशाही बचावचे जनक लोकनायक जयप्रकाश नारायण चौकात भाजपा व ओबीसी आघाडी तर्फे आयोजित जाहीर निषेध कार्यक्रमात आमदार सावरकर बोलत होते. 



ओडिसा येथे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाती विषयी वक्तव्य करून ओबीसी समाजाचा अपमान केला हा प्रकार समस्त ओबीसी समाजाचा आहे.

    


खासदार  संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस तथा आमदार  रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष  जयंत मसने,  किशोर मांगटे पाटील,  विजय अग्रवाल,  अनुप धोत्रे, कृष्णा शर्मा, गिरीश जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, देवाशिष काकड, रमेश अलकरी,  आम्रपाली उपर्वट, दिलीप भरणे, राहुल देशमुख, संतोष पांडे, दिलीप मिश्रा, रमेश करिहार, संदीप गावंडे,,सिद्धार्थ शर्मा, पवन महल्ले, सागर शेंगोकार, कपिल बुंदेले, हरीश अलीमचंदानी, नितेश पाली, संजय झाडोकार,  संतोष डोंगरे, विवकी ठाकूर सुमन गावंडे,  वैशाली शेळके,  स्मिता कायंदे, आरती शर्मा, डॉक्टर अशोक ओलबे , डॉक्टर योगेश शाहू, जान्हवी डोंगरे, रंजना विंचनकर, निशा कडी, राखी तिहीले, छाया तोडसान,  प्रणिता समरीतकार, संध्या लोहकपुरे,आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, रणजित खेडकर, अजय शर्मा, विद्याधर काकड, गोपाळ मुळे, चंदू महाजन, सुनील उंबरकर, दिलीप नायसे, अनिल नावकार, मिलिंद राउत, हरिभाऊ काळे, योगेश मानकर, अक्षय जोशी, सतीश ढगे ,सिद्धेश्वर देशमुख, शितल जैन, उज्वल बामनेट, केशव हेडा, सुहास धोटे,मनोज साहू, अमोल गीते, जगदीश झामरे, टोनी जयराज, हेमंत साठवले, हर्ष चौधरी, रितेश जमणारे, अविनाश जाधव आदी पदाधिकारी यावेलो उपस्थित होते.

टिप्पण्या