court news: कलम 138 खटल्यातून आरोपीची न्यायालयातून निर्दोष मुक्तता





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विद्यमान दुसरे प्रथम न्याय दंडाधिकारी, अकोला यांच्या न्यायालयात अकोला येथील डॉ. महेश इन्नानी यांना परक्राम्य लिखित अधिनियमची The Negotiable Instruments Act,1881 कलम 138 अंतर्गत असलेल्या खटल्यातून  5 फेब्रुवारी 2024 रोजी निर्दोष मुक्त करण्यात आले.



तक्रारकर्ता ॲड. राजनारायण मिठाईलाल मिश्रा यांना वर्ष 2020 मध्ये आरोपी नामे डॉ. महेश इन्नानी यांनी त्यांच्या बहिणीच्या शिक्षणाकरीता व खाजगी कामाकरीता पैश्यांची आवश्यकता आहे असे म्हणून रु. 1,25,000/- मागितले. सदरहू पैशे फिर्यादिने आरोपी यांच्या खात्यात हस्तांतरित केले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीस पैशे मागितल्या नंतर आरोपीने आय.सी.आय. सी. आय बँकेचा धनादेश रु. 1,25,000/- फिर्यादीस दिला. परंतु धनादेश वटविण्याकरिता लावला असता, सदर धनादेश हा धनादेश देणार यांच्याकडून थांबविण्यात आला. या शेऱ्यानिशी परत आला. त्यानंतर फिर्यादी ॲड. राजनारायण मिठाईलाल मिश्रा यांनी आरोपीला नोटीस पाठवून त्याच्या विरुद्ध विद्यमान न्यायालायात धनादेश अनादारीत झाल्या कारणाने खटला दाखल केला.



सदरहू खटल्यात आरोपीला नोटीस मिळाल्यानंतर आरोपी हा त्यांचे वकील ॲड. पप्पू मोरवाल व ॲड. राकेश पाली यांच्या मार्फत न्यायालायात हजर झाले. प्रकरणाचे दस्तऐवज पाहून आरोपीच्या लक्ष्यात असे आले कि सदर धनादेशावरील हस्ताक्षर व स्वाक्षरी ही आरोपीची नाही व सदरहू चेक हे चोरीला गेलेले असून, त्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे आरोपीने रीतसर केलेली आहे. या प्रकरणा मध्ये फिर्यादी यांनी त्यांची बाजू सिद्ध करण्याकरिता स्वतःचा पुरावा दिला व त्यांची बाजू मांडली तसेच आरोपीने त्यांची बाजू मांडण्याकरिता स्वतःचा पुरावा व हस्ताक्षर तज्ञ यांचा पुरावा कागद पत्रासह दाखल करून पुरावा सादर केला. तसेच दोन्ही पक्षांनी त्यांची बाजू सिद्ध करण्याकरीता न्यायालयात उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल करून युक्तीवाद सादर केला.



विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपीने मांडलेले पुरावे जसे कि, चेकवरील स्वाक्षरी तसेच चोरी झालेले चेकची तक्रार व त्या अनुषंगाने फिर्यादी विरुद्ध दाखल केलेली तक्रार व एफ.आय.आर तसेच फिर्यादी कायदेशीर जबाबदारीपोटी असलेली देयक हे सिद्ध न करू शकल्या कारणाने विद्यमान न्यायालयाने आरोपीस या प्रकरणामध्ये निर्दोष दोषमुक्त केले. आरोपीतर्फे ॲड. पप्पू मोरवाल, ॲड. राकेश पाली ॲड. आनंद साबळे, ॲड. नागसेन तायडे यांनी काम पाहिले.


टिप्पण्या