political news: ना. रामदास आठवले यांचे 15 जानेवारीला अकोल्यात आगमन; गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषदेला करतील संबोधित






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले (भारत सरकार नवी दिल्ली) यांचे अकोला येथे  १५ जानेवारी  रोजी आगमन होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक अशोक नागदेवे आणि जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांनी दिली. 




शासकिय विश्रामगृह येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांनी आठवले यांच्या दौरा विषयी माहिती दिली.




रामदास आठवले हे सकाळी वाशिम येथे भुमी हक्क परिषदेचा कार्यक्रम आटोपुन दुपारी मालेगांव तालुक्यातील बोराळा येथील अन्यायग्रस्त मृतक कांबळे कुटुंबाची सांत्वनपर भेट देऊन दुपारी १२.३० वाजता पातुर शहरात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटक आकाश हिवराळे तसेच रिपाइचे तालुका प्रमुख पंडीत सरदार यांच्या नेतृत्वात रामदास आठवले  सत्कार आटोपुन अकोला येथे सुनिल अवचार जिल्हाध्यक्ष रिपाइं यांचे राहते घरी दुपारी १.३० वाजता गृह प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर भगतसिंग चौक (सिंधीकॅम्प) डी.एस.पी.ऑफीस समोर युवक आघाडीचे महानगर अध्यक्ष ब्रम्हानंद प्रधान यांच्या नेतृत्वात दु.२.१५ वा.सत्कार आटोपुन शासकीय विश्रागृह अकोला येथे पत्रकार परिषदेला दु.२.३० वा. पत्रकारांना संबोधीत करतील.




 त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाटयगृह अकोला येथे सायं ४ वा. गायरान जमीन अतिक्रमण हक्क परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष सुनिल अवचार तसेच स्वागताध्यक्ष पदी बुध्दभूषण गोपनारायण असून कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक अशोक नागदेवे असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हयाचे महासचिव जे.पी. सावंग हे करतील. प्रमुख उपस्थिती म्हणून रिपाइंचे राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, महा. प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, राष्ट्रीय संघटन सचिव भुपेश थुलकर, रिप झोपडपट्टी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुमीत वजाळे, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष मोहन भोयर, पश्चिम विदर्भाचे उपाध्यक्ष त्रंबकदादा शिरसाट तसेच आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गायीका कडूबाई खरात तसेच भाग्यश्री इंगळे यांच्या भीम गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. खुले नाटयगृहातील कार्यक्रम आटोपल्यानंतर युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बुध्दभूषण गोपनारायण यांच्या स्वागत समारंभाला बुध्दविहार, कृषीनगर येथे उपस्थित राहतील. त्यानंतर अकोला येथून पुसद कडे रवाना होतील.






पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सुनिल अवचार, जिल्हा महासचिव जे.पी. सावंग, युवक जिल्हाध्यक्ष बुध्दभूषण गोपनारायण, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटक आकाश हिवराळे, युवक महानगरचे अध्यक्ष ब्रम्हानंद प्रधान, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश तायडे, जिल्हा संघटक दादाराव गवई प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या