- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला : कुणाचंही आरक्षण न काढता मराठा आरक्षण देता येईल मात्र योग्यवेळ आल्यावर आपण याची व्याप्ती काय आहे, कशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येईल, हे आपण सांगणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
प्रकाश आंबेडकर अकोल्यात शुक्रवारी आयोजित ओबीसी संवाद सभे दरम्यान माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पत्नी प्रा. अंजली आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर देखील उपस्थित होते.
छगन भुजबळ यांच्या आजच्या अंबड येथील सभे संदर्भात बोलतांना त्यांनी राजकारणात चॅलेंज नको तर घटनेच्या चौकटीत राहून मागण्या पूर्ण करून घेण्याचा सल्ला ही यावेळी त्यांनी दिला. तर राज ठाकरे यांचा बोलावता धनी कोण याच उत्तर त्यांनी द्यावा, असे बोलत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सुध्दा निशाणा साधला.
5 राज्यांच्या निकाला संदर्भात बोलतांना त्यांनी तेलंगणा येथे BRS पक्षाची स्थिती उत्तम असून छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये काँग्रेसची परिस्थिती चांगली असून राजस्थानला आपण गेलो नसल्याने या संदर्भात बोलणार नसल्याच ते स्पष्ट म्हणाले.
लोकसभेच्या तयारीला वंचित बहुजन आघाडी पक्ष लागला असून जाती जाती मध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांपासून लोकांना सावध करण्याचं कार्य सुरू असल्याच ही आंबेडकर म्हणाले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा