CBI enquiry:बाळापूर मध्ये स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरण: सीबीआय मार्फत चौकशी होणार;गृह विभागाने घेतली दखल




भारतीय अलंकार 24

अकोला: जिल्हयातील बाळापूर तालुक्यात यावर्षी स्वातंत्र्य दिनी बाळापूर येथे दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतलेल्या स्व. बिलाद खान बिस्मिल्ला खा यांच्या वारसांनी त्यांच्या शेतात असलेल्या घराच्या आवारात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार मेरी माती मेरा देश, हर घर तिरांगा उपक्रम राबविण्यात येत असताना बाळापूर पोलिसांकडून हा कार्यक्रम उधळून लावत फडकविलेले तिरंगा ध्वज उतरवून आणि सजवलेल्या कमानी खाली पाडून पोलिस ठाण्यात घेऊन गेले  त्यामुळे तिंरग्याचा अवमान झाल्याचा आरोप निवेदनकर्ता बिस्मिल्ला खान मो बुलंद खान यांनी केला असुन  या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती या निवेदनाची दखल राज्य गृह विभागाने घेतली असून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. 


शेत सर्व्हे नंबर ९१ ब हे स्वातंत्र्य सैनिक बीलाद खा बिस्मिल्ला खाँ यांचे नावे असुन त्याच शेतात त्यांच्या वारसांनी घर बांधलेले आहे  त्यातच पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा चा नारा दिल्याने दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचे कुटूंब असल्याने त्यांनीही स्वातंत्र्य दिनी एका कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सगळीकडे तिरंगा ध्वज व तिरंग्या सारख्या कमानी उभ्या करून राष्ट्रभक्तिगीत वाजवले जात असताना एका माजी आमदार यांनी पोलीसांना माहिती देऊन तो कार्यक्रम उधळला. पोलिसांनी ते ध्वज उतरवून कमानी खाली पडल्या आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि संध्याकाळी उशिरा ते सामान परत केले. याबाबत महिलांनी पोलीसांना या करवाई बाबत विचारणा केली असता, पोलिसांकडे उत्तर नव्हते. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दुपारी २ वाजुन १५ मिनिटांनी स्थानिक एका माजी आमदार यांच्या सांगण्यावरून  बाळापूर पोलिसांनी हा प्रकार  केला असून हा राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अवमान आहे. त्यामुळे या प्रकरणाची सी बी आय मार्फत चौकशी करा, अश्या मागणीचे निवेदन बिस्मिल्ला खान मो बुलंद खान यांनी निवेदन नोटरी रजिस्टर करून, रजिस्टर पोस्टाने आणि ई मेल  द्वारे पाठविण्यात आले. तर रेहाना परवीन एजाज हुसैन, जकिया परवीन बिस्मिल्ला खान, खैरुमिसा आदील रशीद खान सर्व राहणार बाळापूर यांनी पोलिस महासंचालक मुंबई यांना निवेदन पाठविले असल्याची  माहिती निवेदनकर्ता  यांनी अकोल्यात पत्रकारांना दिली होती. या प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडे नोटरी रजिस्टर करून पाठवले आहे. तर महिलांनी राज्याचे पोलिस महासंचालक मुंबई यांना निवेदन पाठवले असल्याची माहिती निवेदन कर्त्याने दिली होती. या निवेदनाची दखल घेत राज्य गृह विभागाने या प्रकरणाची चौकशी करून निवेदनकर्त्याला कळवावे, असा आदेश संबंधित विभागाला दिला आहे. यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती दस्तुरखुद्द निवेदनकर्ता बिस्मिल्ला खान मो बुलंद खान यांनी दिली आहे.

.

टिप्पण्या