amandeep express restaurant: 'अमनदीप एक्सप्रेस' रेल्वे कोच रेस्टॉरंट चे अकोल्यात होणार लोकार्पण ;रेल्वे प्रवाश्यांसह अकोलेकरांना मिळणार स्वादिष्ट भोजनाचा आनंद




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे - जगड 

अकोला: रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी, भारतीय रेल्वे देशातील सर्व व्यस्त रेल्वे स्थानकांवर रेल कोच रेस्टॉरंट उघडत आहे.  जेथे भेट देणारे प्रवासी स्वादिष्ट खाद्यपदार्थांसह एक संस्मरणीय अनुभव घेवू शकतात.  या रेल्वे कोच रेस्टॉरंट्सची खास गोष्ट म्हणजे ते रेल्वे स्थानक परिसराच्या बाहेरही उघडण्यात आले आहेत. जेणेकरून प्रवाशांसह स्थानिक लोकांना येथे स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेता येईल. अकोला रेल्वे स्थानक परिसरात देखील एक नवीन रेल कोच रेस्टॉरंट सुरू करण्यात येत आहे.  रविवार 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता या 'अमनदीप एक्स्प्रेस' रेल्वे कोच रेस्टॉरंटचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.




आलिशान टेबल्स आणि सुंदर प्रकाशयोजना 



भारतीय रेल्वे मंत्रालयाने देशातील मुख्य रेल्वे स्टेशनवर प्रवश्यांच्या सोयी साठी 24*7 तास सेवा देणारे रेस्टॉरंट उभारण्याचा संकल्प केला. यामध्ये विदर्भातील अकोला रेल्वे स्थानक येथे अमनदीप एक्सप्रेस नावाने हे रेस्टॉरंट नागरिकांच्या सेवेत सज्ज होत आहे.  

येथे प्रवासी तसेच स्थानिक रहिवासी उच्च दर्जाच्या स्वादिष्ट भारतीय जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील.

अमनदीप एक्सप्रेस रेल कोच रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा मो. अजिम मो. नईम आणि मो.मुब्बशीर यांच्या म्हणण्यानुसार, प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना येथे तयार करण्यात आलेल्या रेल्वे कोच रेस्टॉरंटमध्ये उच्च दर्जाचे स्वादिष्ट भोजन दिले जाईल.  या रेल्वे कोच रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी अप्रतिम सुखदायक व्यवस्था करण्यात आली आहे.  प्रवाशांना डब्याच्या आत तसेच कोचच्या बाहेरही जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. रेल्वे कोच रेस्टॉरंटचे आतील भाग अतिशय सुंदर डिझाइन करण्यात आले आहे. जेणेकरून येथे येणाऱ्या लोकांना एखाद्या आलिशान रेस्टॉरंटसारखे वाटेल. येथे जेवणाचा अनुभव संस्मरणीय राहील. आलिशान टेबल्स तसेच सुंदर प्रकाशयोजना आणि आकर्षक पुष्पगुच्छ असलेले रेल कोच रेस्टॉरंट मध्ये येवून प्रवाशी आणि स्थनिक नागरिकांना एक वेगळा आनंद आणि अनुभूती मिळेल.





कॉन्टिनेन्टल फूड आणि बरच काही 


देशाची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेचे चित्र आता खूप बदलले आहे. अकोला रेल्वे स्टेशन अधिकारी आणि अमनदीप परिवार भारतीय रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी अहोरात्र झटत आहे. या रेस्टॉरंट मुळे अकोला रेल्वे स्थानक परिसरातील सुशोभीकरण मध्ये आणखी भर पडली आहे. अमनदीप मध्ये कॉन्टिनेन्टल फूड, वेज, नॉनवेज, आयस्क्रिम, प्राकृतिक फळांचे फ्रेश जुस,मिल्क शेक, साउथ इंडीयन फूड आदी सोबतच बॉम्बे स्ट्रीट फूड, इराणी चाय,बनमस्काचा स्वाद खवय्यांना मिळणार आहे.




स्वादिष्ट व्यंजनाचा लाभ घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्यावी


अमनदीप एक्सप्रेस रेल कोच रेस्टॉरंट (अमनदीप कॅफे)चा लोकार्पण सोहळा रविवार  12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संचालक मो. अजीम मो. नईम यांच्या मातोश्री मेहमूदा बेगम आणि संचालक मो. मुब्बशीर यांच्या मातोश्री अकीलमुन्नीसा यांच्या हस्ते होणार आहे. या रेस्टॉरंटचे डिझाईन आर्की. अंकित आपोतीकर यांच्या कल्पक बुद्धीतून साकारण्यात आले आहे. अकोलेकरानी या वेगळा अनुभूती देणाऱ्या आणि स्वादिष्ट व्यंजनाचा लाभ घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संचालकांनी केले आहे.






टिप्पण्या