. हर्ष बोचरे
ठळक मुद्दे
अखेर पाच तासाच्या अथक प्रयत्नात खदानित बुडालेल्या युवकाचा रात्री 3:00 वाजता घेतला शोध
पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची अंधार असुनही रात्री 3:05 दबंग कामगिरी
21 एप्रिल 2022 रोजीची घटना
घटनास्थळ: शिवणी अकोला रेल्वेस्टेशन नजिकच्या कोठारी खदान
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: कोठारी खदान येथे गुरुवारी सायंकाळी फिरावयास गेलेल्या 20 वर्षीय तरुणाला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यात त्याचा तोल जावून खदानीच्या पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत तरुणाचे नाव हर्ष बोचरे असे आहे. हर्ष हा अकोल्यातील नामवंत विधीज्ञ संजय बोचरे यांचा मुलगा. त्याची अंत्ययात्रा आज 22 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास त्यांचे राहते घर मलकापुर गौरक्षण रोड अकोला येथून निघाली. मोक्षधाम येथे त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे अकोला विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान हर्षला खदानित शोधण्यासाठी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. पाच तासांच्या शोध मोहिमेत अखेर हर्षचा मृतदेह सापडला. उत्तररात्री तीन वाजताच्या सुमारास बाहेर काढण्यास पथकाला यश आले.
21 एप्रिल 2022 रोजी हर्ष बोचरे हा अकोला येथील शिवणी रेल्वे स्टेशन नजिकच्या कोठारी खदानमधे बुडाल्याची माहीती रात्री 8:30 वाजता खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार सनस यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन साठी पाचारण केले. लगेचच जिव-रक्षक दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार, ऋषीकेश राखोंडे,आकाश बगाडे,गोकुळ तायडे, आदित्य राखोंडे,योगेश कुदळे,यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन रात्री 10:00 घटनास्थळी रवाना केले.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी रेस्क्यु बोट उपलब्ध करून दिली. रेस्क्यु टीम ने रात्री 10:00 वाजता खदानित रेस्क्यु बोटद्वारे सर्च ऑपरेशन चालु केले.
खदानीत कुठं 15 फुट तर कुठ 25-30 फुट खोल पाणी व कपारी होत्या. त्यातही अंधार असल्याने सर्च ऑपरेशनला अडथळे निर्माण होत होते. शेवटी रात्री 3:05 मिनटांनी या युवकाचा मृतदेह रेस्क्यु टीमने शोधुन बाहेर काढला.
यावेळी खदान पो.स्टे.चे एपीआय वाघमारे आणि पोलीस कर्मचारी, तसेच नियंत्रण कक्षाचे एपीआय चव्हाण,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे,अग्निशमन अधिकारी मनिष कथले आणि त्यांचे सहकारी शुभम वाघ, मो. साहील, सचिन ठोसरे, भुषण ठोसर, व नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते,अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा