- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
shegaon-obc-social-rights-meet: शेगाव: ओबीसी समाज अधिकार संमेलन: राज्यपालांनी टिका सहन करण्याची शक्ती वाढवायला पाहिजे - भूपेश बघेल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Shegaon: OBC Social Rights Conference:Bhupesh Baghel
शेगाव, दि.28 :(प्रतिनिधी) : भाजपा पक्ष ओबीसींचा वापर फक्त मतांसाठी करून घेत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल देखील पक्षनिष्ठ आहेत. राज्यपालांनी आपल्या पदाची गरिमा पळायला पाहिजे अथवा होणाऱ्या टिका सहन करण्याची शक्ती त्यांनी वाढवायला पाहिजे, असा टोला छतिसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नाव न घेता लगावला.
ते शेगाव येथील ओबीसी समाज अधिकार संमेलनात सोमवारी बोलत होते.
राज्यातील ओबीसी समाज बांधवांना राजकीय आरक्षणासह त्यांच्या न्याय व ज्वलंत प्रश्न सुटावे, यासाठी ओबीसी संघर्ष समिती, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ आदींच्या माध्यमाने संतनगरी शेगाव येथील स्वर्गीय गजाननदादा पाटील मार्केट यार्ड येथे सोमवारी महामेळावा पार पडला.
केंद्र सरकारची बघ्याची भूमिका- नाना पटोले
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी आपल्या भाषणात राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचेवर निशाणा साधत म्हणाले की, आपल्या सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या विषयी कोणी बेताल वक्तव्य करून अपमानित करीत असेल व केंद्रांच सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असेल तर आपल्यालाच आपला विचार करावा लागेल व बहुजनांची ताकद त्यांना दाखवावी लागेल, असे वक्तव्य केले.
राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री ना.यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस सह विरोधकांवर टीका केली.
ओबीसींचे आरक्षण आणि त्यांच्या ज्वलंत मागण्या आणि प्रश्नांसंदर्भात ओबीसी महासंघाच्या वतीने संतनगरी शेगावात आज ओबीसी समाज अधिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला आशिष दुवा, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, पक्ष नेते ज्ञानेश्वर पाटील, राहुल बोन्द्रे, आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे, जयश्री शेळके, श्याम उमाळकर, दत्ता खरात, कासम गवळी आदी उपस्थित होते. स्वागतपर भाषण ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.
सर्वानुमते ठराव पारित
मेळाव्यामध्ये ओबीसी समाज आरक्षण व इतर प्रश्ना बाबत काँग्रेसचे रामविजय बुरुंगले, स्वाती वाकेकर, प्रकाश तायडे, नातिकोद्दीन खतीब, राजेश एकडे, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे यांनी ओबीसी समाजाचा संदर्भातील विविध ठराव समोर मांडले. हे ठराव उपस्थितांनी टाळ्या वाजवून संमती दर्शवित पारित केले. मेळाव्याला जवळपास 10 हजार ओबीसींची उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा