jordan asian boxing championship: एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ जॉर्डन मध्ये दाखल; अकोल्याची स्टार ज्युनिअर बॉक्सर पलककडून पदकाची आशा





ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जॉर्डन येथे आजपासून सुरू झालेल्या युथ व ज्युनियर एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये अकोल्याची स्टार ज्युनिअर बॉक्सर पलक झांबरे 48 किलो वजन गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. भारतीय संघात पलक ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे.भारताला पलक कडून पदकाची आशा आहे. 



अलीकडेच राष्ट्रीय संघ निवड चाचणीत पलकने हरियाणाच्या बॉक्सरला धूळ चारून भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. याच वर्षी महाराष्ट्रात झालेल्या दोन स्पर्धेत पलकने सुवर्ण पदक जिंकले. पलकची नजर आता जॉर्डन एशियन चॅम्पियनशिप सुवर्ण पदकावर खिळली आहे. 



"पलक ही अकोला क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्रची प्रशिक्षणार्थी असून, तिने अल्पावधीतच मोठी मजल मारली आहे. ज्युनियर एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये भारताला तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे."

सतीशचंद्र भट

राज्य क्रीडा मार्गदर्शक 

क्रीडा प्रबोधिनी, अकोला

 

भारतीय बॉक्सिंग फेडरेशन ने 27 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान अमान, जॉर्डन येथे होणार्‍या 2022 ASBC आशियाई युवा आणि ज्युनियर पुरुष आणि महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप साठी 50 सदस्यांचा संघ निवडला आहे.





यामध्ये 2021 च्या स्पर्धेतील काही पदक विजेत्यांचा समावेश आहे. स्पर्धेतील लढती 2 मार्चपासून सुरू होतील तर 13 आणि 14 मार्च रोजी अंतिम सामने खेळविले जातील. युवा आणि ज्युनियर या दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी 25 बॉक्सर्सचा समावेश आहे.


गत रौप्यपदक विजेते विश्वनाथ सुरेश, वंशज, निवेदिता कार्की आणि तमन्ना हे १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश असलेल्या युवा संघाचे नेतृत्व करत आहेत.  तर गतविजेती निकिता चंद ज्युनियर संघाचे नेतृत्व करीत आहे. ज्यात 13 मुले आणि 12 मुली आहेत.


 

चॅम्पियनशिपपूर्वी, भारतीय युवा आणि ज्युनियर बॉक्सर्सने मेगा स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून रोहतक आणि भोपाळ येथील साई (SAI) नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स येथे आयोजित केलेल्या 21 दिवसांच्या राष्ट्रीय शिबिरांमध्ये भाग घेतला. 


 

2021 मध्ये दुबई येथे झालेल्या ASBC आशियाई युवा आणि ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत, भारतीय संघाने 14 सुवर्णांसह 39 पदकांसह यश मिळविले होते. यावेळी देखील ज्युनियर आणि युवा बॉक्सरांकडून अधिक पदकांची आशा करण्यात येत आहे.


असा आहे भारतीय संघ


ज्युनियर संघ



युवा संघ




टिप्पण्या