robbing: luxury bus:Akola crime: अकोला पोलिसांची यशस्वी कामगिरी: लक्झरी बस अडवून 50 लाख रूपयांची कॅश लुटणारी टोळी 24 तासाच्या आत गजाआड

Successful performance of Akola police: robbing luxury bus and stealing cash of Rs 50 lakh disappears within 24 hours




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला :अकोल्यातून मुंबईकडे जाणारी लक्झरी बस अडवून तीन युवकांनी 50 लाख रूपयांची कॅश सिनेस्टाईल लूटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता रिधोरा मार्गावरील ढाब्याजवळ घडली होती. अकोला पोलिसांनी 24 तासाच्या आत या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपींना गजाआड करून यशस्वी कामगिरी बजावली आहे.



स्थानीय गुन्हे शाखा अकोलाचे तपास अधिकारी सपोनी नितिन चव्हाण आणि त्यांच्या टीमला मिळालेली गोपनीय माहिती आधारवर यशपाल मदनलाल जाधव 28 वर्षीय, कमला नेहरू नगर, अकोला , रामविलास उर्फ ​​राम गोविंद पवार वय 33 वर्ष धाबेकर नगर खडकी अकोला, तनवीर खान उर्फ ​​सोनू जहांगीर खान वय 25 वर्ष  गंगा नगर वाशिम बायपास अकोला , संतोष नगर, खडकी, अकोला निवासी अमित उर्फ ​​पिंकू प्रेमशंकर मिश्रा 28 वर्ष यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी रिधोरा येथे लक्झरी बस थांबवून 50 लाख लूटले असल्याची कबूली दिली. यामुळे यासर्व आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 




ही कारवाई  जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त अधीक्षक मोनिका राउत यांच्या मार्गदर्शन मध्ये स्थानीय गुन्हे शाखा  प्रमुख संतोष महल्ले, सपोनी नितिन चव्हाण, गोपाल जाधव, गोपीलाल मावळे, दशरथ बोरकर, संदीप काटकर, फिरोज खान, गोकुल चव्हाण,  शक्ति कांबळे, वीरेंद्र लाड, स्वपनील खेडकर आदींनी केली.




काय आहे घटना


अकोल्यातून मुंबईकडे जाणारी लक्झरी बस अडवून तीन युवकांनी एका व्यापारीचे 50 लाख रूपयांची कॅश सिनेस्टाईल लूटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान  रिधोरा मार्गावरील ढाब्याजवळ घडली होती. रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध सुरू होता. 


व्यापारी ईश्वर देवासी हे 50 लाख रोकड घेवून मुंबईकडे लक्झरी बसने जात होते. देवासी यांच्या मागावर तीन युवक होते.  ज्या लक्झरी बसमधून देवासी चालले होते ती लक्झरी बस रिधोरा मार्गावरील स्पीड ब्रेकरवर ढाब्याजवळ युवकांनी अडविली. दरम्यान बळजबरीने देवासी  यांच्या जवळील रोकड युवकांनी हिसकावून तेथून पळ काढला.


यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होवून स्थानिक गुन्हे शाखेने लगेच तपास चक्रे फिरविली. देवासी यांच्या ओळखीचे  आणि गुरूवारी भेटलेल्या व्यक्तींची सीसीटीव्ही फुटेजवरून चौकशी सुरू केली होती. 



शुक्रवारपर्यंत याप्रकरणातील आरोपींना गजाआड करू,अशी ग्वाही स्थानिक गुन्हे शाखेने दिली होती, हे येथे उल्लेखनीय आहे.


टिप्पण्या