corona vaccinate : १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान यांचे आभार

Central government's decision to vaccinate everyone above 18 years of age;  The Chief Minister thanked the Prime Minister (file photo)



मुंबई : येत्या १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.देशात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरावरून करण्यात येत होती.



माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कालच पंतप्रधान मोदी यांना लसीकरण व लस निर्मिती संबंधाने उत्पादकांना मदत इत्यादी बाबी नमुद केलेले पत्र देवुन ही मागणी केली होती या मागणीची दखल घेत,आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणासाठी नियमा प्रमाणे नोंदणी करावी लागणार आहे.



मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मानले आभार


काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. 



आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे 

राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या