- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Sanjay Raut: ईडी समोर हजर राहण्यास वर्षा राऊत यांनी वेळ मागितला-संजय राऊत यांनी दिली प्रसारमाध्यमांना माहिती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी समन्स पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी ५ जानेवारी पर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमां सोबत संवाद साधताना दिली.
वेळ वाढवून मागितली आहे का? असे पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत यांनी सांगितलं की, “हो मागितली आहे. इतकं मोठं प्रकरण आहे की, संपूर्ण देश हादरला आहे. आपल्या देशात सध्या काहीच सुरु नाही. सध्या ही ५० लाखांची एकच केस त्यांच्याकडे आहे. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल.”
“जी गोष्ट आम्हाला लोकांसमोर ठेवायची होती ती पत्रकार परिषदेत सांगितली आहे. अजून काही गोष्टी आहेत त्या देखील वेळ आल्यावर सांगेन. आम्ही जे सांगितलं आहे ते ईडी आणि देशासाठी मार्गदर्शक असेल,” असे संजय राऊत म्हणाले.
“मला ईडीची कीव येते. कधी काळ यांना फार प्रतिष्ठा होती, आता त्यांना ती मिळत नाही. त्यांना सरकारी गुलाम मानलं जातं हे खेदजनक आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. पण ज्यांच्याकडे लपवण्या सारखं आहे ते भाजपात प्रवेश करतात,” असा टोला त्यांनी लगावला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा