अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला शेकडो गरजू वकिलांना मदतीचा हात

अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला शेकडो गरजू वकिलांना मदतीचा हात

   लॉकडाउनचा वकिलांनाही फटका 

अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसला आहे. न्यायालय बंद असल्याने वकिली व्यवसायवर देखील याचा परिणाम होत आहे. अनेक वकिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे,त्यात लॉकडाउनमुळे आणखी खालावली. घरात अन्नधान्य नाही. अशा गरजू वकिलांना अकोला बार असोसिएशनने अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला मदतीचा हात दिला.शनिवारी १०० धान्य किटचे वाटप केले असून, काही वकील सदस्य अजूनही प्रतीक्षेत आहेत. बार  कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य मोतीसिंग  मोहता लवकरच अधिक किट मिळाव्यात, याकरिता प्रयत्नात आहेत. लॉकडाऊन असूनही महिला उपाध्यक्ष ऍड.भारती रूंगटा पूर्णवेळ उपस्थित होत्या. सचिव पीयूष देशमुख यांनी सामान आणण्यापासून तर अंतिम यादी तयार करेपर्यंत सर्वच काम केले. ऍड सुहास राजदेरकर, ऍड. सौरभ शर्मा,,ऍड प्रवीण राठी,रवी श्रीवास्तव आदींनी सहकार्य केले. असोसिएशनचे अध्यक्ष ऍड आनंद गोदे यांनी ६ एप्रिल रोजीच आवाहन केले होते की,गरजू वकिलांना अन्न धान्य व औषध उपचारासाठी मदत हवी असल्यास त्यांना निश्चितच मदत केली जाईल. मात्र, एकही गरजू सदस्य समोर आले नाही.त्यानंतर  वरीष्ठ अधिवक्ता यांच्याशी संपर्क साधून मदत घ्यावी,असे आवाहनही करण्यात आले. त्यावेळी ७ ते ८ वकिलांनी संपर्क साधला.जास्त संख्येने मागणी करीता गरजू सदस्य पुढे आलेले नसल्याने वरिष्ठ वकिलांचे सहकार्य न घेता गोदे यांनी स्वखर्चाने आवश्यकता नुसार मदत केली. 


दरम्यान, बार कोन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने घेतलेला ठराव बार कोन्सिल ऑफ इंडियाने मंजूर केला. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने मागणी करीत असलेल्या वकीलांकरिता धान्य किट देण्याचे ठरविले. त्यानंतर परत आवाहन करण्यात आले. स्वाभिमानी वकील मदत घेण्यास पुढे येत नव्हते. निःसंकोचपणे पुढे यावे व  मागणी असलेल्या वकिलांची यादी बनविण्यास मदत करावी,असे वारंवार आवाहन अध्यक्ष गोदे यांनी केले.काहींनी आवाहनाला प्रतिसाद दिला तर काहींना असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी मदत पोहचवली. मदत घेतलेल्या गरजू वकिलांची नावे कुठेच जाहीर होणार नाही,याची दक्षता सर्व पदाधिकारी घेत असल्याचे ऍड. आनंद गोदे यांनी सांगितले. 

टिप्पण्या