Old couple murder: त्या' वृद्ध दांपत्याची हत्याचं! भाडेकरूनीच साधला डाव!!

'त्या' वृद्ध दांपत्याची हत्याचं!
भाडेकरूनीच साधला डाव!!
             मृृृत भगत दाम्पत्य

अकोला : अकोला शहरातील बळवंत कॉलनी परिसरात आज पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले होते. नथ्थूराम भगत आणि हेमलता भगत असं या वृद्ध दांपत्याचं नाव आहे. नथ्थूराम भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी.  मृतक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास झालेले असल्यामूळे हा चोरी आणि खुनाचा प्रकार असल्याचा आरोप भगत यांच्या मुलीने केला होता. अखेर या वृद्ध दांपत्याची हत्या झाल्याचं पोलिस तपासात समोर आलं. पोलिसांनी अवध्या बारा तासातच आरोपींचा छडा लावला. आरोपी हे भगत यांचे भाड़ेकरू आहेत. या प्रकरणातं पोलिसांनी मो.रफिक मो.हजमा आणि मेहबुदाबी परवीन वसिम खान या दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपींनी भगतं या वृद्ध दांपत्याची गळा आवळून हत्या केल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. आणि घरातील पाच लाखांचे दागिने आणि सत्तर हजार रोख रक्कम लंपास केली होती.तर हा खून पैश्यासाठी झाला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र सपकाळ यांनी सांगितले.
.........
The murder of that 'old couple'!

 The innings made by the tenants !!

टिप्पण्या