Big breakingअकोला पुन्हा हादरला;हरिहरपेठ मध्ये हत्या!

Big breaking
अकोला पुन्हा हादरला;हरिहरपेठ मध्ये हत्या!

घटनास्थळ
अकोला: हरिहरपेठेत मंगेश यादवची हत्या.
 जुनेशहर पोलिस स्टेशन अंतर्गत हरिहरपेठ जवळील शितला माता मंदिर परिसरात  मंगेश यादव नावाच्या युवकाची हत्या झाल्याची घटना  सोमवारी उघडकीस आली.  घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिस घटनेपर्यंत पोहोचले आहेत.पुढील कारवाई सुरू आहे.घटने मागील कारण आद्यप स्पस्ट झाले नाही.

शहरात हत्येच्या घटनेत दिवसंदिवस वाढ होत आहे. एकीकडे कोरोनाशी लढत असताना,दुसरी कडे शहरात हत्याकांडाचे सत्र सुरू आहे.वृद्ध भगत दाम्पत्य यांची हत्या प्रकरणाची शाई वाळत नाही,तोच आज भरदिवसा हरिहर पेठ मध्ये हत्याकांड घडले. आज पुन्हा अकोला आणखी एका हत्याकांडाने हादरून गेला.दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडने अकोलेकर धास्तावले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  घराजवळ राहणाऱ्या काही युवकांशी मंगेशचे काही दिवसांपासून वाद सुरू होते ,तर हे हत्याकांड त्यातूनच घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
........


टिप्पण्या